के.के वाघ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काकासाहेब नगर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी…
प्रतिनधी . ज्ञानेश्वर भवर

के.के वाघ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, काकासाहेब नगर येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. शरद कदम व विद्यालयातील सर्व शिक्षक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
कार्यक्रमात अध्यक्षस्थानी बोलतांना कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. शरद कदम यांनी “जे जे आपणासी ठावे, ते ते इतरा सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन” या उक्तीप्रमाणे गुरू आपल्याकडचे ज्ञान निरंतर वाटत राहतो व सर्वांना ज्ञानाने संपन्न करत असल्याचे सांगत आपणही आपले ज्ञान वाटावे असे आवाहन केले. तसेच शिक्षक श्री. गणेश आवारे यांनी आपल्या मनोगतातून गुरुशिवाय आयुष्य निरर्थक असल्याचे सांगत विविध पौराणिक कथांतून गुरुमुळे आयुष्य कसे घडते हे विशद केले. तर श्री. विकास शिंदे यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकाची विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील भूमिका कशी महत्वाची आहे ते स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल उशीर व मयुरी गायकवाड यांनी व कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणिता कुयटे हिने केले तर स्नेहल घोडेकर हिने उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी किरण शिंदे, योगेश पुंड, उत्तम कर्वे, सचिन कोल्हे, शेख शादाब, संदीप शिंदे, चकोर स्वप्नील, योगेश खैरे, भाग्यश्री पानगव्हाणे, आढाव सोनाली, मोकळ अर्चना, भाग्यश्री खराक, बेंडके पल्लवी, रोशनी शिंदे, पल्लवी कोल्हे, शितल शिंदे, श्वेता पगारे, ज्योत्स्ना सोनार, दिपाली दाभाडे, पूनम अष्टेकर, सारिका कुशारे, योगिता जगझाप, सुरेखा सोनवणे, नेहा देसाई, रीना शिरसाठ, योगिता बिडवे आदी उपस्थित होते.