ताज्या घडामोडी
शासकिय प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा बापखेडा येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
माधव आहेर

कळवण तालुक्यातील शासकिय प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा बापखेडा शाळेत देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्य सकाळी गावात प्रभात फेरी काढून लेझीमच्या तालावर नाचत नाचत शाळेच्या प्रांगणात आले व नंतर शाळेचे मुख्यध्यापक श्री. जोपळे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे जेष्ठ नागरीक ग्रामस्थ,सर्व शिक्षक वर्ग, महिला उपस्थित होते
सूत्रसंचालन गायकवाड सरांनी केलें. नंतर शाळेचे विदयार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हणून तिरंगा ध्वजास मानवंदना देवून देशभक्ती पर गीते सादर केली.आणी मनोरंजन साठी सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले.