मानवस्पर्श सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टाकळी(विंचूर) येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले…..!!

दि.०८ ऑक्टोबर २०२२ शनिवार रोजी मानवस्पर्श सेवाभावी संस्था,लासलगाव या सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टाकळी(विंचूर) शाळेतील २६१ विद्यार्थ्यांना हासुरे इंग्रजी प्रायमर,मराठी सचित्र बालमित्र अंकलिपी, पेन्सिल, खोडरबर इ.शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात वर्षभरात परीसरातील विविध शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे खजिनदार प्रा.सुनिल देवढे सर यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक रंगनाथ नामदेव बोराडे व प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण किसनराव बोराडे ,पंडित प्रकाश मोकाटे हे होते.
संस्थेचे अध्यक्ष सुनिल वाघचौरे, उपाध्यक्ष सूर्यकांत जाधव, खजिनदार प्रा.सुनिल देवढे, कार्याध्यक्ष प्रा.अरुण देवढे, विश्वस्त योगेश न्याहारकर,केशवराव जाधव हे मान्यवर उपस्थित होते तसेच,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब रामभाऊ मोकाटे शिक्षक परशुराम ठाकरे,संजय देवरे, बायजा भदाणे,विमल केकान, सुरेखा बेंडके, प्रगिता आहिरे उपस्थित होते.
या उपक्रमासाठी अनंत सोमवंशी(अमेरिका), ज्ञानेश्वर शिंदे (पुणे),सचिव समीर देवढे सर, विश्वस्त डॉ.शशिकांत देवढे, सोपान जाधव, ज्ञानेश्वर देवढे, सुरेखा देवढे, सभासद गोरख देवढे सर,प्रताप आढाव सर,सचिन शेलार सर,गणेश औटी सर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन उदार सर यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक वाळीबा कदम यांनी मानले.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.