अंत्योदय योजना व पिवळे रेशन कार्डची रेशन मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मागितली लाच
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- तक्रारदार हे मालेगाव येथील राहणारे असून त्यांचा लाकूड खरेदी विक्रीचा व्यवसाय असून ते सामाजिक कार्य ही करतात. तक्रारदार यांनी ते राहत असलेल्या मालेगाव शहर परिसरातील 15 गरीब व गरजू कुटुंबीयांचे अंत्योदय योजना व पिवळे रेशन कार्ड ची रेशन मिळण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रकरणे सादर केली आहेत. तक्रारदार हे दिनांक 4/4/24 रोजी मालेगाव येथील आलोसे रवींद्र दहिते, अव्वल कारकून धान्य वितरण अधिकारी कार्यालय मालेगाव यांच्याकडे त्यासंदर्भात गेले असता त्यांनी प्रत्येक कुटुंबीयांचे 1500/- रुपये याप्रमाणे एकूण 15 कुटुंबीयांच्या रेशन कार्ड नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी एकूण 22,500/- रुपयाची पंचासमक्ष मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले व दिनांक 08/04/2024 रोजी पंचांसमक्ष 22,500/- रुपये पैकी 500 रू तक्रारदार यांना परत करून 22,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे.
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दुरध्वनी क्रमांक-
02532578230,
टोल फ्री क्रमांक १०६४