निफाड उपविभागात “विद्युत सुरक्षा सप्ताह” उत्साहात संपन्न
मुख्य संपादक राहुल वैराळ

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निफाड येथील उपकेंद्रांमध्ये वृक्षारोपण संपन्न
मॅरेथॉन द्वारे, प्रबोधनाद्वारे, विविध स्पर्धांच्या माध्यमातून, रॅली द्वारे विद्युत सुरक्षा बाबत जनजागृती मोहीम संपन्न
महावितरण कंपनीच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात महावितरण तर्फे १ जून ते ६ जून २०२५ पर्यंत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आलेला होता. या सुरक्षा सप्ताहात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे म्हणजेच मॅरेथॉन, गावागावांमध्ये व शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती पर व्याख्याने व विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले.. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणचे निफाड उपविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी २ जून रोजी विविध ग्रामपंचायत, वाड्या वस्त्या, शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन विज ग्राहकांना विद्युत सुरक्षिततेबद्दल माहिती दिली. दिनांक ३ जून व ४ जून रोजी शालेय विद्यार्थी व महावितरणचे पाल्य यांच्याकरिता होरायझन स्कूल व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचे करीता “विद्युत सुरक्षा” या विषयावर निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती त्यात एकूण २२० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला व प्रतिसाद दिला. सदर स्पर्धेमध्ये विजेते विद्यार्थी व स्पर्धकांना महावितरण कडून प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे. सदरचे स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाड येथील प्राचार्य श्रीमती शिंदे मॅडम व होरायझन ॲकॅडमी निफाड च्या प्राचार्या श्रीमती सोनवणे मॅडम व त्यांचे सर्व कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तसेच त्यांनी देखिल महावितरणचे आभार मानले. दि ०५ जून २०२५ रोजी महावितरण निफाड उपविभागामार्फत जनमानसांत विद्युत सुरक्षितते बाबत जनजागृती व्हावी याकरिता संपूर्ण निफाड गावातून पायी “विद्युत सुरक्षा रॅली” काढण्यात आली, सदर रॅलीमध्ये महावितरण निफाड उपविभागातील सर्व अधिकारी/ कर्मचारी/बाह्यस्त्रोत कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांनी हिरीरीने सहभाग घेऊन रॅली यशस्वी केली.
निफाड गावातील सर्व गल्ल्या “सेव एनर्जी सेव अर्थ”, “विजेची बचत काळाची गरज”, “विद्युत सुरक्षा आमची जबाबदारी” या घोषणांनी दुमदुमून गेला. रँली मधे ग्राहकांना विद्युत सुरक्षिततेचे आवाहन करण्यात आले निफाड गावातील लोकांनी देखील सदर रॅलीला भरभरून प्रतिसाद दिला. रॅली संपल्यानंतर निफाड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री निलेश नागरे यांनी पर्यावरण दिवसानिमित्त महावितरण कार्यालयाच्या उपकेंद्रांमध्ये वृक्षारोपण केले,
व अशाप्रकारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून “विद्युत सुरक्षा सप्ताह” हा निफाड उपविभागात आनंदात व उत्साही वातावरणात संपन्न झाला आहे.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता महावितरणचे मा.मुख्य अभियंता श्री लटपटे साहेब,मा.अधीक्षक अभियंता श्री थुल साहेब तसेच चांदवड विभागाचे मा. कार्यकारी अभियंता श्री काळू माळी साहेब यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले….
यावेळी सर्व शाखा अभियंता जनमित्र व बाह्य स्त्रोत कर्मचारी व सर्व यंत्र चालक व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.