
लासलगाव सविस्तर वृत्त असे की, आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले लासलगाव मध्ये प्रगतशील शेतकरी श्री सिताराम मुरलीधर जगताप यांनी पारंपरिक पद्धतीने आपल्या मुलाप्रमाणे आपल्या शेतीत राबणाऱ्या प्राण्यांवर प्रेम करून प्रेमाची भावना जोपासली ज्या बैलांमुळे आपल्याला दोन वेळच्या अन्न मिळण्यास मदत होते त्या बैलांचा वार्षिक सन म्हणजे पोळा हा होय. या दिवशी बैलांना स्वच्छ धुऊन त्यांना त्यांच्या मानाप्रमाणे साज चढवल्या जातो नंतर संपूर्ण गावात वाजत गाजत वाद्यामध्ये देवदर्शन करून आपल्या घरासमोर पूजा विधी केली जाते त्यांना पुरणपोळी चे अन्न दिले जाते नंतर शेतकरी राजा त्यांच्यासाठी वर्षातून एक दिवस निरंकार उपवास करतो पूजा विधी आटोपल्यानंतर शेतकरी राजा पुरणपोळीच्या जेवणावर उपवास सोडतो अशा पद्धतीने ग्रामीण भागात अजूनही रूढी परंपरा जोपासून प्राण्यांवरील प्रेमाची भावना जागृत होताना दिसते . हा सण संपूर्ण कुटुंबात व गावात आनंदात साजरा केला जातो