लासलगाव महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर रायपूर येथे संपन्न
मुख्य संपादक राहुल वैराळ

(लासलगाव) : नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव वरिष्ठ महाविद्यालय विभाग, कनिष्ठ महाविद्यालय (+ २ स्तर) आणि विश्वलता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भाटगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर बुधवार दिनांक २५/१/२०२३ ते मंगळवार दिनांक ३१/१/२०२३ या कालावधीत मु.पो.रायपुर, ता.चांदवड, जि.नाशिक या ठिकाणी संपन्न झाले. सदर शिबिराचे उदघाटन संस्थेचे संचालक मा.श्री चंद्रशेखर गोविंदराव होळकर यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयराव चांगदेवराव होळकर संचालक मा.श्री.हसमुखभाई पटेल, मा.श्री.चंद्रकांत ठोके, लासलगाव महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे, भाटगाव महाविद्यालयाचे मा. प्राचार्य ज्ञानदेव कदम, डॉ.सोमनाथ आरोटे, प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, डॉ.गणेश गांगुर्डे, प्रा.प्रभाकर गांगुर्डे इ. उपस्थित होते. या उदघाटनाच्या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी जीवनात शिबिराचे महत्व व आपल्या कामातून गावात ठसा उमटविण्याचे आवाहन करून श्रमदान करण्याचे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना मा.श्री.संजयराव चांगदेवराव होळकर यांनी आपल्या अनमोल मार्गदर्शनातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी शिबिराच्या माध्यमातून समाजविकास व व्यक्तिमत्वाचा विकास साधावा असे आवाहन केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. मिलिंद साळुंके यांनी प्रास्ताविक केले तर लासलगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे तसेच भाटगाव महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव कदम यांनी देखील याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व माजी सरपंच श्री देवमन पवार यांनी आपले मनोगतातून सर्व शिबिरार्थींना देखील याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.
या विशेष हिवाळी शिबिरात कार्यक्रम अधिकारी प्रा.देवेंद्र भांडे यांनी सर्व स्वयंसेवकांना योगाची माहिती सांगून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. या विशेष हिवाळी शिबिराच्या दरम्यान श्रमदानाच्या सोबतच संगीत खुर्ची स्पर्धा, बौद्धिक खेळ, क्रीडा स्पर्धा अशा विविध गुणदर्शनपर स्पर्धा घेण्यात आल्या. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसाठी आयोजित बौद्धिक सत्रात दिनांक २५ जानेवारी रोजी ‘ताणतणाव व्यवस्थापन’ या विषयावर प्रा.किशोर अंकुळनेकर यांनी मार्गदर्शन केले तर ‘राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान’ या विषयावर प्रा.सुनिल गायकर यांनी मार्गदर्शन केले. दिनांक २६ जानेवारी रोजी प्रा.भूषण हिरे यांनी ‘मूल्यशिक्षण व युवक’ या विषयावर मार्गदर्शन केले तर प्रा.किशोर गोसावी यांनी ‘मराठी साहित्यातील सामजिक जाणीवा’ या विषयावर मार्गदर्शन केले. दिनांक २७ जानेवारी रोजी प्रा.डॉ.संजय निकम यांनी ‘युवकांपुढील वाढत्या समस्या’ या विषयावर मार्गदर्शन केले तर प्रा. डॉ. नारायण यांनी ‘शारीरिक स्वास्थ्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. दिनांक २८ जानेवारी रोजी प्रा.जितेंद्र देवरे यांनी ‘जैव विविधता संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ.बाजीराव आहिरे यांनी ‘हवामानाचे बदलते स्वरूप’ या विषयावर मार्गदर्शन केले. दिनांक २९ जानेवारी रोजी प्रा.उज्वल शेलार यांनी ‘२१व्या शतकातील इंग्रजीचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ.सोमनाथ आरोटे यांनी ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप वडाळीभोईचे सरपंच मा.श्री.नितीन आहेर, कार्यक्रमाचे अध्यक्ष नूतन विद्या प्रसारक मंडळाचे संचालक मा.श्री.चंद्रशेखर गोविंदराव होळकर आणि मा.श्री.हसमुखभाई पटेल, जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.आत्माराम कुंभार्डे, रायपुर गावच्या प्रथम नागरिक श्रीमती यशोदा सूर्यभान गुंजाळ, लासलगाव महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे, रायपुर येथील श्रीराम विद्यालयाचे मा.मुख्याध्यापक श्री.एस.जी.ठाकरे, श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठानचे संचालक आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद येवला शहराध्यक्ष मा.भूषणभाऊ लागवे, मा.प्रा.किशोर गोसावी, विश्वलता महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.श्री.संतोष ढोले, स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व माजी सरपंच श्री.देवमन पवार, श्री.प्रदीप गुंजाळ, श्री.कारभारी गुंजाळ , श्री.कारभारी कोल्हे, श्री.तनवीर शेख, श्री.पाटील सर, श्री.विलास सोनवणे सर, श्री.कौतिक आहेर, रायपूरचे पोलीस पाटील श्री.साहेबराव नारळे यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये विजयी स्वयंसेवकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात वृक्षारोपण, ग्राम स्वच्छता, मूल्यशिक्षण, पर्यावरण जनजागृती, रस्ता सुरक्षा अभियान, आरोग्य शिबिर व आरोग्य सर्वेक्षण, व्यसन मुक्ती, गावातील रस्त्यांचे खड्डे बुजवणे असे विविध उपक्रम राबविले तसेच प्रश्नावलीच्या माध्यमातून विविध समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
समारोपाच्या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा.मिलिंद साळुंके यांनी प्रास्ताविक केले तर मा.श्री.नितीन आहेर, मा.श्री.डॉ.आत्माराम कुंभार्डे, मा. प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, मा.श्री.भूषणभाऊ लाघवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मा.श्री.चंद्रशेखर गोविंदराव होळकर यांनी अध्यक्षीय समारोप केला.
सदर विशेष हिवाळी शिबिर यशस्वी होण्यासाठी नूतन विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा.श्री.गोविंदरावजी होळकर, सर्व मॅनेजिंग बोर्डाचे सन्माननीय सदस्य, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी मार्गदर्शन केले. सदर विशेष हिवाळी शिबिर यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मिलिंद साळुंके, डॉ.प्रदीप सोनवणे, प्रा.उज्वला शेळके, प्रा.मारोती कंधारे, प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.अक्षय बळे, प्रा.अक्षय पानगव्हाणे, प्रा.प्रीती गुजर, प्रा.पल्लवी देशमुख, श्री.प्रदीप गुंजाळ, श्री.सुनिल खुटे, श्री.कौतिक आहेर, नैनेश लासूरकर, सर्व रा.से.यो. स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील इतर प्राध्यापक बंधू-भगिनी तसेच शिक्षकेतर बंधूंनी देखील बहूमोल सहकार्य केले.