महावितरण कंपनीच्या विज कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जिव धोक्यात घालून रात्रीतूनच केला विज पुरवठा सुरळीत व ग्राहक सेवेला दिले प्रथम प्राधान्य
मुख्य संपादक राहुल वैराळ

निफाड तालुका व परिसरात दि १३.०६.२०२५ रोजी संध्याकाळी ४:३० ते ५:०० वाजेदरम्यान प्रचंड जोराचा पाऊस, वारावादळ तसेच विजांचा कडकडाट सहित पाऊसाची दमदार सुरुवात झाली. दरम्यान पिंपळस,सुकेणे तसेच कारखाना परिसरात दोन ते तीन ठिकाणी विज पडून विज कंपनीच्या ३३ के व्ही पिंपळस,जळगाव व नैताळे लाईनवर मोठा अडथडा निर्माण झाला त्यामुळे पिंपळस, नैताळे, नांदुरमध्यमेश्वर तसेच जळगाव निघोज ह्या चारही उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. यामध्ये ३३ के व्ही लाईनवरील पिन इन्सुलेटर विविध ठिकाणी फुटले व विजवाहक तारा खाली आल्या.
त्यामुळे पिंपळस, नांदुरमध्यमेश्वर तसेच निफाड ग्रामीण कक्षातील कर्मचाऱ्यांनी लागलीच विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. सदर मोहिमेत पावसाचा व्यत्यय येत होता व आकाशात प्रचंड विजा चमकत होत्या. अश्या कठीण तसेच भयावह परिस्थितीत विज कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता ग्राहक सेवेला महत्व दिले व भर पावसात खंडित झालेला वीजपुरवठा अथक परिश्रम करून रात्री ठीक ०३:२० मी सुरळीत केला.
सदर मोहिमेत निफाड उपविभागात नव्यानेच रुजू झालेले उपकार्यकारी अभियंता श्री सुनील राऊत साहेब हे स्वतः कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी रात्री जागेवर उपस्थित होते. तसेच सदर मोहिमेत सहाय्यक अभियंते श्री हेमंत शिनकर, जितेंद्र बोरसे, साकेत पाटील, स्वप्नील सवई व राहुल भगत हजर होते.
जनमित्रांमध्ये श्री हांडगे, कुमावत, सांगळे, जगदाळे, प्रवीण पवार, विजय पवार,शिंदे, अकिब, दिघे, सुनील, साहिल व ईतर असे तीनही कक्षाचे जनमित्र व कर्मचारी उपस्थित होते. विद्युत कंत्राटदार मध्ये अरविंद मोरे, अभिजीत सानप तसेच संतोष भोसले यांची मदत झाली.
वरील मोहीम ही नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री सुंदरजी लटपटे साहेब, नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. राजेश थुल साहेब तसेच चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. केशव काळूमाळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी संपन्न झाली.