कलगीधर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
प्रतिनिधी श्री.ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत्त असे की,
लासलगाव येथील कलगिधर इंग्लिश मीडियमस्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतिक करण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम बालगोपाल, पालक, ग्रामस्थ व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून उस्ताहात पार पडला. उपस्थितानी विद्यार्थ्यानंच्या कालागुणांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव देण्यासाठी पालक मोठ्या संख्येने शालेय प्रांगणात उपस्थित होते. शाळेचे सेक्रेटरी सरदार जगदेवसिंगजी भल्ला यांचा हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी वेगवेगळी नृत्य सादर केली व वर्षभरात घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कोटमगावचे उपसरपंच श्री. योगेश पवार, पोलीसपाटील श्री. सचिन आहिरे, लासलगावचे प्रेस क्लब चे सदस्य आसिफ पठाण, कोटमगावचे पोलिस टाइम्स 24/7 चे पत्रकार श्री. नाना भवर, सेवेंथ डे स्कूलचे प्रिंसिपल जोसेफ खंडागळे, मुख्यअध्यापक संजय धुमाळ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दीपक बाबरे व शिक्षक वृंद श्री. सुरेश जाधव, श्री. राजू जगधने वैशाली शिंदे, पूजा जाधव, सिद्धी बोढारे,नीलम पेंढारी,सौ. प्रियांका पठारे,अश्विनी खांगळ आदि शिक्षकांनी परिश्रम घेतले.