ताज्या घडामोडी
आता फक्त एक क्यू आर कोड स्कॅन करा आणि लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी व्हा.
नाशिक प्रतिनिधी
लाडकी बहीण योजना जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा , त्यासाठी अर्जाचा शोधा शोध होऊ नये, म्हणून मुंबईतील के एम रुग्णालय समोर राज्यातील पहिला क्यूआर कोड असलेला बॅनर लावण्यात आला आहे. या क्यू आर कोड मुळे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करून तो मोबाईल वर भरता येणार आहे. याशिवाय ऑनलाइन सबमिशनची देखील सुविधा शासनाकडून करण्यात आली असून त्यामुळे सर्वसामान्य माता बहिणींचा वेड वाचणार आहे .तर तलाठी किंवा कोणत्याही शाखेत जाण्याची गरज लागणार नाही .ऑनलाईन फॉर्म डाऊनलोड करून ते तलाठी ऑफिस मध्ये सुद्धा सबमिश करू शकणार आहेत.