ताज्या घडामोडी

प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना धमकीचे पत्र “

सिन्नर प्रतिनिधी

लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये अमरावतीच्या जागेवर वाद सुरू आहे ,प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचे निश्चित झाले आहे. अशातच आज बच्चू कडून ना तुमचा केजरीवाल करू अशी धमकी एका पत्राद्वारे देण्यात आली आहे , “जास्त उड उड करू नको , तुला ही केजरीवाल सारखं जेलमध्ये टाकेल , नाहीतर उडवून टाकेल ” अशी चिठ्ठी सापडली आहे . प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना उघडपणे धमकी देण्यात आली आहे. आज नेहरू मैदानात अज्ञात इसमांकडून गर्दीतही चिठ्ठी मिळाली आहे या चिठ्ठी मुळे एकच खळबळ उडाली आहे. हे चिठ्ठी कोणी आणि का लिहिली याची अजून माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे .कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून मैदानातील सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.