
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी .शेखर हे शुक्रवारी( 31 मे) सेवानिवृत्त झाले .त्यामुळे रिक्त झालेल्या नाशिक एस आय जी पदाचा अतिरिक्त कार्यभार राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील आर्थिक गुन्ह्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. राज्य महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाने या संदर्भात आदेश दिले आहेत.