रुकडी, चोकाक, हेरले अतिग्रे, मटका राजरोसपणे पोलिसांच्या कारवाईची गरज नागरिकांची मागणी

रुकडी, अतिग्रे, चोकाक, हेरले,येते गावामध्ये राजरसपणे अवैधरित्या ठिकाणी मटका सुरू असून याकडे हातकणंगले पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून,होत आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांनी अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत तरीही रुकडी चोकाक अतिग्रे हेरले,गावामध्ये गावातील मुख्य चौकात दोन ठिकाणी माळभाग दोन ठिकाणी कोल्हापूर सांगली महामार्गावर दोन ठिकाणी चौकात एका ठिकाणी हरिजन वसाहत येथे दोन ठिकाणी राजरसपणे मटका सुरू असून यामुळे या ठिकाणी महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या मटक्याच्या आहारी गावातील कामगार शेतमजूर कष्टकरी नोकरदार महिला गेल्या आहेत मटक्यामुळे अनेक जण भिक कंगाल झाले आहेत मटक्यामुळे मटका मालक गब्बर झाल्या असून मटका खेळणारे भिक कंगाल झाले आहेत हातकणंगले पोलिसांनी या मटक्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी या मटका व्यवसायिकावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य ग्रामस्थ व महिला मधून मोठ्या प्रमाणात होत आहे