
भाटगांव ता. चांदवड शाळेची विद्यार्थिनी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चांदवड तालुका ग्रामीण मध्ये प्रथम आली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी सन 2022 – 23 गुणवत्ता यादीत रँक 331 चांदवड तालुका ग्रामीण मध्ये प्रथम क्रमांकाने पात्र ठरली.तसेच राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे विज्ञान प्रकल्पात राज्यस्तरावर पोहोचली व तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत भाग घेऊन द्वितीय क्रमांक मिळवणारी कुमारी ज्योती रतन जाधव या विद्यार्थिनीचे शाळेचे वतीने मुख्याध्यापक माननीय श्री. सानप सर पर्यवेक्षक माननीय श्री. बोठाडे सर शिष्यवृत्ती प्रमुख माननीय श्री. कापसे सर व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यालयाच्या वतीने तिचे अभिनंदन केले.