
वावी : जुन्या भांडणाची कुरापत काढून सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे ४० वर्षीय तरुणास जमावाने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारासाठी दाखल करण्याच्या पूर्वीच मृत्यू झाल्याची घटना येथे घडली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील 13 जणांच्या विरोधात खुन व मारहानीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ भाऊसाहेब आदमाने असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो आपल्या कुटुंबासमवेत पाथरे बुद्रुक शिवारात राहत होता शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास आदमाने कुटुंब जेवण करून झोपण्याच्या तयारीत असतानाच गावातील राहटळ कुटुंबातील व्यक्तीने येऊन त्यांच्या घराचा दरवाजा तोडला व घरात घुसून राहटळ कुटुंबीयातील दहा ते पंधरा जणांनी आदमाने कुटुंबावर हल्ला केला, त्यात त्यांनी लाकडी दांडे, लोखंडी पाईप, लोखंडी गज यासारख्या प्राण घातक वस्तुंनी त्यांच्यावर हल्ला केल्यामुळे सोमनाथ आदमाने हे गंभीर रित्या जखमी झाले, त्यांना जखमी अवस्थेत कोपरगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, सून मनीषा व नात संस्कृती यांना देखील यावेळी मारहाण करण्यात आली असे मृताचे वडील भाऊसाहेब आदमाने यांनी सांगितले. शरद दगडू राहतळ, तुषार राजेंद्र रहाटळ, रवींद्र दत्तात्रेय रहाटळ ,अनिता संतोष राहतळ, सुनीता शरद राहतळ ,शैला बाळासाहेब राहतळ, ज्योती रवींद्र राहतळ, सर्व राहणार पाथरे यांनी सुद्धा आदमाने परिवारावर हल्ला केल्याची तक्रार वावी पोलीस ठाण्यात केली असून त्यानुसार वरील सर्वांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर. पाराजी वाघमोडे .हवालदार सचिन काकड अधिक तपास करत आहेत.