कलगीदार इंग्लिश मीडियम स्कूल कोटमगाव येथे बालदिन उत्साहात साजरा

दिनांक 14 नोव्हेंबर रोजी कलगीधर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहात बालदिन म्हणून साजरी.
या प्रसंगी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन श्री सुरेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी पंडित नेहरूंच्या जीवनपटावर आपले विचार प्रकट केले. बालवाडी मधील विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा करून कवितांचे गायन केले. शाळेतील शिक्षकांनी पंडित नेहरू च्या जीवनातील प्रेरणादायक घटना सांगितल्या.
बालदिनाचे औचित्य साधून व्यावहारिक ज्ञान होण्यासाठी ‘आठवडे बाजार’ शालेय पटांगणात लावण्यात आला. यामध्ये शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी समस्त शालेय शिक्षकांकडून छोटीशी भेटवस्तू देण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री दीपक बाबरे, सुरेश जाधव, श्वेता जपे, अश्विनी खांगळ नीलम पेंढारी, वैशाली शिंदे, विनिता कांकरिया, पूजा जाधव, सविता ढोमसे, प्रियंका पठारे, संतोष मंडलिक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.