शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश.
कार्यकारी संपादक विकास कोल्हे

शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे येवला – लासलगांव मतदार संघ निफाड पुर्व तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. काल सायंकाळी नंदनवन बंगला मार्बल हिल मुंबई येथे अचानक प्रकाश पाटील यांनी मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादाजी भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, संजय दुसाने, भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, महानगरप्रमुख दीपक टिंमरे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रकाश पाटील हे गेल्या 25 वर्षापासुन शिवसेनेत कार्यकरत होते , विद्यार्थी सेनेपासुन त्यांनी कामाला सुरवात केली होती. त्या नंतर लासलगांवचे शहर प्रमुख म्हणुन 15 वर्ष कार्य केले. त्या नंतर गेल्या 4 वर्षापासुन तालुका प्रमुख म्हणुन जबाबदारी पार पाडली. निफाड तालुका प्रमुख या पदावर असताना त्यांनी अनेक कामे मार्गी लावले आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिवसेना पोहोचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. तसेच सर्व सामान्य माणसांचे प्रश्न पिण्याचे पाणी, रस्ते, विज,ग्रामिण रुग्णालय, कांदाप्रश्न, शेतकर्यांसाठी आंदोलनात, गोरक्षण करण्यासाठी वेळोवेळी सक्रिय सहभाग घेऊन त्यांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयन्त करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर जनआंदोलनाचे अनेक गुन्हे दाखल देखिल झालेले आहेत. मात्र अलीकडच्या काळात पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या माध्यमातून सर्व सामान्यांचे मोठ्या प्रमाणावर कामे मार्गी त्यांचा प्रयत्न सुरू असतो. त्यामुळेच त्यांचा शिंदे गटाकडे ओढा वाढत चालला होता. त्यातूनच त्यांनी काल अचानक बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून लवकरच येवला लासलगाव मतदार संघातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा उध्दव ठाकरे गटाला येवला-लासलगांव मतदार संघात मोठा फटका बसणार आहे.