ताज्या घडामोडी

राजगुरू नगरहून नाशिक कडे येणाऱ्या बसला लागली आग

मुख्य संपादक राहुल वैराळ

राजगुरूनगरहून नाशिककडे येणाऱ्या बसने पुढे उभ्या असलेल्या बसला धडक दिल्याने झालेल्या या अपघातात बस पेटल्याने दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना पळसे येथे घडली. या धडकेत राजगुरूनगरहून येणारी बस जळून पूर्ण खाक झाली असून, बसमधील प्रवासी सुखरूप आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, की आज दुपारी राजगुरूनगर डेपो येथून नाशिककडे एमएच 07 सी 7081 या क्रमांकाची बस येत होती. ही बस पळसेजवळ आली असताना त्या बसच्या पुढेच एमएच 14 बीटी 3635 या क्रमांकाची सिन्नर डेपोची बस उभी होती.

त्या बसमधून प्रवासी उतरत असताना राजगुरूनगरच्या बसने समोर असलेल्या दोन दुचाकीस्वारांना जोरात धडक दिल्याने ते दोघे या दोन बसमध्ये दाबले गेले. समोरील बसला धडक दिल्यानंतर क्षणात राजगुरूनगरच्या बसने पेट घेतला. घटना घडल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत बसमधील प्रवाशांना बसच्या काचा फोडून सुखरूप बाहेर काढले; मात्र दुचाकीवरील दोघांचा या अपघातात मृत्यू झाला असे सूत्रा कडुन समजले

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.