
आज दिनांक 14 एप्रिल
2023 ला सकाळी 11 वाजता सप्तशृंगगड येथील मम्हादेवी चौकात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सप्तशृंगी गड सरपंच, श्री,रमेश पवार यांच्या हस्ते डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.पत्रकार तुषार बर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व पत्रकार निलेश कदम यांनी बुद्ध वंदना घेण्यात आली.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य संदीप बेणके, राजेश गवळी ,धनेश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ व कार्यकर्तयांनी उपस्थिती लावली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मम्हादेवीचे पुजारी, श्री वसंतराव साळुंखे, अमृतराव पवार सुरेश पाटील, पत्रकार सोमनाथ मानकर, रंभाजी ऊणवणे, लक्ष्मण गायकवाड, प्रसाद साळुंखे, राजु केंद्रे,धिरज पवार, हनुमान महाले आदींनी सहकार्य केले.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय जय कार आणि संपूर्ण सप्तशृंगी गड दुमदुमून गेला होता